॥ श्री स्वामी समर्थ॥

नित्य पूजाअर्चा व अन्नदान सेवा

श्री स्वामी समर्थ मठ श्री क्षेत्र प्रयाग दक्षिण काशी कोल्हापूर, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी समर्पित हे पवित्र स्थळ, सर्व भक्तांसाठी श्रद्धा, सेवा आणि अध्यात्माचा केंद्रबिंदू आहे.

नित्य पूजाअर्चा

प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी श्रींची मनोभावे पूजा, अभिषेक, मंत्रपठण व आरती केली जाते. गुरुवार व अन्य पवित्र दिवसांमध्ये विशेष महापूजा, श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन, श्री गुरुचरित्र पारायण, नामजप व भजन आयोजित करण्यात येते.

अन्नदान सेवा

“अन्न हेच परब्रह्म” या भावनेतून, मठामध्ये दर गुरुवारी दुपारी 12 ते 2:30 पर्यंत गरजू व भक्तांसाठी नि:शुल्क अन्नदान सेवा केली जाते.

भावनिक उद्देश

स्वामी भक्त व गरजू लोकांना सहकार्याची भावना व त्यांची सेवा हीच स्वामी सेवा

आपले सहकार्य

आपणही या पवित्र आणि शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. अन्नदान, पूजेसाठी साहित्य, देणगी किंवा स्वयंसेवा स्वरूपात आपले योगदान आम्ही विनम्रतेने स्वीकारतो.

स्थळ: श्री स्वामी समर्थ मठ क्षेत्र प्रयाग दक्षिण काशी कोल्हापूर,
संपर्क: 8208354571, 8407957139 

|| श्री स्वामी समर्थ महाराज की जय ||

जय गुरुदेव दत्त